डान्सर सपना चौधरीच्या गाडीला अपघात, पण..

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

सपना चौधरी यांच्या फॉर्च्युनर या गाडीला नाताळच्या रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातातून त्या बचावल्याचे वृत्त आले होते. पण, आता स्वतः सपना चौधरींनी खुलासा करत म्हटले आहे, की ज्या गाडीचा अपघात झाला, त्यामध्ये मी नव्हते.

नवी दिल्ली : हरियानातील प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या गाडीला मोठा अपघात झाला असून, गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, त्यावेळी गाडीत फक्त चालक असल्याचे सपना चौधरीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सपना चौधरी यांच्या फॉर्च्युनर या गाडीला नाताळच्या रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातातून त्या बचावल्याचे वृत्त आले होते. पण, आता स्वतः सपना चौधरींनी खुलासा करत म्हटले आहे, की ज्या गाडीचा अपघात झाला, त्यामध्ये मी नव्हते. फक्त चालक होता आणि तो जखमी आहे. 

सपनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी माझ्याच कारला अपघात झाला. मात्र, त्या कारमध्ये मी नव्हते. त्यादिवशी मी एका रेकॉर्डिंगला गेले होते. माझा एक सरकारी आणि एक लेखक माझी गाडी घेऊन गेले होते. मी कारमधून उतरल्यानंतर काय झाले हे मला माहिती नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sapna Chaudhary accident Haryanvi dancer talked about accident