The agreement is expected to strengthen interstate water management and improve irrigation and power distribution across beneficiary states.
Sakal
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी नवी दिल्लीत आंतरराज्यीय जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नर्मदा लवादाचे लाभधारक असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सरदार सरोवर प्रकल्पाच्या बांधकाम खर्चाच्या वाटपाबाबत आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देयकांच्या एकरकमी तोडगा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.