काडेपेटीत मावणारी साडी पाहिलीत का? किंमत जाणून अवाक व्हाल | Saree In Matchbox | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saree In Matchbox
काडेपेटीत मावणारी साडी पाहिलीत का? किंमत जाणून अवाक व्हाल | Saree In Matchbox

काडेपेटीत मावणारी साडी पाहिलीत का? किंमत जाणून अवाक व्हाल

तेलगंणातील (Telangana) तरुण हातमाग विणकराने आपल्या हाताने एक साडी (Saree) तयार केली आहे. ती साडी काडेपेटीत (Matchbox) सहज माऊ शकते. तेलंगणा जिल्ह्यातील राजण्णा सिरसिला येथील रहिवासी नल्ला विजय याने ही रेशमाची साडी विणली आहे. हाताने ही साडी विणायला त्यांना दोन आठवडे लागले. या साडीचे मूल्य १२ हजार रूपये आहे. ही साडी मशिनमध्ये तीन दिवसात तयार होऊ शकते. अशावेळी या साडीचे मूल्य आठ हजार रूपये आहे. या विणकराने त्याचे वडील नल्ला परांधमुलु यांच्याकडून प्रेरणा घेत आपला परंपरागत व्यवसाय पुढे नेला आहे. तो हातमागावर साड्या विणतो.

हेही वाचा: माणूसकीला काळिमा! ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्यांनी लिफ्ट वापरल्यास ३०० रूपयांचा दंड

साडी बघून मंत्र्यांना वाटले आश्चर्य

विजय यांनी राज्यातील मंत्री के. तारका रामा राव, पी.सबिथा इंद्रारेड्डी, वी. श्रीनिवास गौड आणि एराबेली दयाकर राव यांना ही साडी दाखवली. या मंत्र्यांनी साडीचे खूप कौतुक केले. त्यांनी याआधी अशा प्रकारची साडी बघितली नसल्याचे सांगितले. ही साडी कशी केली, त्याचे विणकाम कौशल्यही त्यांनी समजून घेतले.

हेही वाचा: दररोज एक मंत्री, 3 आमदार भाजप सोडणार; माजी मंत्र्यांचा दावा

ओबामांनाही दिली होती भेट

विजयने विणलेली साडी पहिल्यांदा 2017 च्या जागतिक तेलुगू परिषदेत प्रदर्शित करण्यात आली होती. 2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा पत्नी मिशेलसह भारत भेटीवर आले होते. तेव्हा त्यांनी मिशेल यांना अशी साडी भेट दिली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TelanganasareePrice
loading image
go to top