Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

Madurai Court Sentences 9 Policemen to Death in 2020 Sathankulam Custodial Killing Case: या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
Madurai Court Sentences

Madurai Court Sentences

esakal

Updated on

मदुराई: पोलिसांच्या छळामुळे बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना सहा वर्षांपूर्वी तामिळनाडू येथे घडली होती. या प्रकरणात आता मदुराईच्या विशेष कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत ९ पोलिस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता.

ही घटना १९ जून २०२० रोजी घडली होती. थूथुकुडी जिल्ह्यातील साथानकुलम येथे व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांचे मोबाईलचे दुकान होते. कोरोनात लॉकडाऊनचे नियम मोडून दुकान जास्त वेळ उघडे ठेवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com