Sati Pratha : ‘त्या’ एका घटनेमूळे राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेला अग्नी दिला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raja Rammohan Roy

Sati Pratha : ‘त्या’ एका घटनेमूळे राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेला अग्नी दिला!

ब्रिटीशांनी भारतावर १५० वर्ष राज्य केल. त्या काळातील कायदे कडक आणि भारतीय नागरीकांच्या विरोधात होते. असे असले तरी ब्रिटीशांनी केलेला एक कायदा भारतीय स्त्रीयांच्या मनाचा विचार करून घेण्यात आला होता. तो म्हणजे सती प्रथा बंद करण्याचा कायदा होय. 4 डिसेंबर 1829 मध्ये ब्रिटीश भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी तो कायदा केला.

या कायद्याद्वारे संपूर्ण भारतात सती प्रथेवर बंदी घालण्यात आली होती. सतीप्रथा ही मानवी स्वभावाच्या आणि भावनांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले होते. हा कायदा बंद करण्यात बंगालमधील समाजसेवक राजा राममोहन रॉय यांचेही योगदान मोठे आहे. त्यांच्या घरात घडलेल्या एका घटनेने ते इतके दु:खी झाले की त्यांनी या क्रूर प्रथेविरोधात आवाज उठवला. काय होती ती घटना पाहुयात.

हेही वाचा: Ashtagandha : अष्टगंध लावल्याने मेंदुला मिळते शीतलता

राजा राममोहन रॉय यांच्या भावाचे म्हणजे जगमोहन यांचे १८१२ मध्ये निधन झाले. त्यावेळी त्यांची रूपवती पत्नी अलकमंजिरी हिला नियमाप्रमाणे सती जाणे निश्चित झाले. सौभाग्यलंकार घातलेली अलकमंजिरी भीतीने थरथर कापत होती. राममोहन यांनी आपल्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ ठरला. हातपाय बांधलेल्या अलकमंजिरीला चितेने ढकलले. तिची जिवंतपणी राख झाली. राजा राममोहन मात्र पेटून उठले. त्यांच्या डोक्यातून ही गोष्ट जाऊ शकली नाही. त्यांनी सतीची प्रथा बंद करण्याचा निश्चय त्यांनी केला अन् वेद, पुराण व श्रुतींचं वाचन व मनन सुरू झालं.

हेही वाचा: Bollywood: 'वध' सिनेमा करण्यामागे 'हे' एकच कारण,नाहीतर नकार पक्का होता; नीना गुप्ता स्पष्टच बोलल्या...

वेद उपनिषदांमध्ये वैदिक संस्कृतीत सती प्रथेला थारा नसल्याचे त्यांनी शोधून काढले. हे राममोहनजींचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी लॉर्ड बेंटिंक व इतर विधिज्ञांशी चर्चा केली. हिंदू धर्मीयांच्या भावनांना हात घालण्यास ब्रिटिश सरकार कचरत होतं. पण राजाजी ठाम राहिले. अखेर ४ डिसेंबर १८२९ रोजी लॉर्ड बेंटिंकने सतीबंदी कायदा आणला.

मुघल काळातही झाले प्रयत्न

मुघलांच्या राजवटीत हुमायूनने ही प्रथा बंद करण्याचा पहिला प्रयत्न केला होता. त्यानंतर अकबराने सती प्रथेवर बंदी घालण्याचा आदेश दिला. स्त्रिया देखील हे स्वेच्छेने करत असल्याने त्यावरही बंदी आणली. स्वेच्छेने आगीत उडी घेतलेल्या स्त्रीयांनी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय असे करू नये असा नियमही त्यावेळी करण्यात आला. 18 व्या शतकाच्या अखेरीस युरोपियन वसाहतींचे राज्य असलेल्या काही भागात ही प्रथा बेकायदेशीर ठरली. पोर्तुगीजांनी १५१५ पर्यंत गोव्यात या प्रथेवर बंदी घातली.

या अनिष्ठ प्रथेला राजा राममोहन रॉय आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अग्नी दिला. तरी त्यानंतरही अनेक वर्ष हे प्रकार सुरूच राहीले. सध्या २१ वे शतक सुरू आहे. अखेर सती प्रथा गेली आणि स्त्रीच्या प्रगतीला गती आली. स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन अशा पायऱ्या चढत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. पण, तरीही तिच्या मागे असलेल्या प्रथा परंपरेच्या नावाखाली तिला सोसाव्या लागणाऱ्या यातना काही कमी झाल्या नाहीत.

टॅग्स :Womens Cornerwomens