

Satpura Tiger Reserve Becomes Safe Haven for 55 Plus Tigers Following Successful Village Relocation and Conservation
esakal
World Tiger Day Satpura Tiger Reserve: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध सातपुडा व्याघ्र प्रकल्पमध्ये वाघांच्या संवर्धनासाठी गेल्या दशकभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटीला (NTCA) पाठवलेल्या ताज्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, रिझर्व्हमध्ये ५५ हून अधिक वाघ आढळले आहेत. यातील सुमारे १० वाघांची प्रथमच नोंद झाली आहे. २०१८ मध्ये झालेल्या वन्यजीव गणनेत येथे ४५ वाघ आढळले होते.