
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात 11 मे पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी देशवासियांना उद्देश्यून ७ जून रोजी हॉस्पिटलमधून एक भावनिक पोस्ट केली होती. मला देशाला सत्य सांगायचं आहे असं त्यांनी पोस्ट म्हटले होते. मलिक यांच्या निधनानंतर आता ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.