"..तर हिंसाचार करुन शेतकरी त्यांचे हक्क मिळवणार" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyapal Malik

"..तर हिंसाचार करुन शेतकरी त्यांचे हक्क मिळवणार"

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक(Satyapal Malik) हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन सतत चर्चेत असतात. शेतकऱ्यांच्या हक्काविषयी बोलताना सत्यपाल मलिक यांनी एक वक्तव्य केले की शेतकऱ्यांना संघर्ष करुनही त्यांचे हक्क मिळाले नाही तर हिंसाचार करुन ते घेईल. या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.राजस्थानमधील जोधपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते,

सत्यपाल मलिक म्हणाले,”शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी पुन्हा उभा राहील. त्याचबरोबर शेतकरी त्यांचे हक्क मिळवतील, असा इशारा यापूर्वीच केंद्र सरकारला दिलाय. जर शेतकऱ्यांना चर्चेतून त्यांचे हक्क मिळाले नाही तर ते संघर्ष करणार आणि जर त्यांना संघर्ष करुनते मिळाले नाही तर ते हिंसाचाराच्या माध्यमातून घेणार. मी केंद्र सरकारच्या विरोधात नाही, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना दडपता येणार नाही.”

हेही वाचा: गिफ्ट कार्ड घेऊन आलीय भाजप सरकार, PF चा व्याजदर घटवताच ममता बॅनर्जींची टीका

“शेतकऱ्यांना आपला हक्क कसा घ्यायचा हे माहीत आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा शेतकरी आंदोलन सुरू करून शेतकरी आपले हक्क घेणार आहेत.” असेही ते म्हणाले.

राज्यपाल पद गमावण्याची भीती नसल्याचेही सत्यपाल मलिक म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मी कोणालाही घाबरत नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Satyapal Malik Said Fwill Take Their Right By Doing Violence If They Will Not Get By Struggling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..