भाजपचं 'ऑपरेशन लोटस्' फेल, 'आप'च्या बैठकीत किती आमदार पोहोचले? भारद्वाजांनी सांगितला आकडा

'भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस अयशस्वी झालं आहे.'
Saurabh Bhardwaj
Saurabh Bhardwajesakal
Summary

'भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस अयशस्वी झालं आहे.'

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी 53 आमदार बैठकीसाठी पोहोचल्यानंतर आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांनी मोठा खुलासा केलाय.

भारद्वाज म्हणाले, भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस् (Bharatiya Janata Party Operation Lotus) अयशस्वी झालं आहे. आप नेत्यानं सांगितलं की, सीएम केजरीवाल इतर आमदारांशी फोनवर बोलले असून प्रत्येकानं शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं. भारद्वाज पुढं म्हणाले, "भाजपनं आमच्या 12 आमदारांशी संपर्क साधला असून त्यांना पक्ष फोडण्यास सांगितलंय. भाजपला आमचे 40 आमदार फोडायचे असून प्रत्येकी 20 कोटी रुपये देऊ करत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय.

Saurabh Bhardwaj
मुस्लिमांना एकापेक्षा जास्त विवाह अन् घटस्फोट देण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही : High Court

दिल्लीत भाजपचं ऑपरेशन कमल अपयशी ठरलं आहे. आज झालेल्या बैठकीत 62 पैकी 53 आमदार उपस्थित होते. काही आमदार देशाबाहेर आहेत, तर मनीष सिसोदिया हिमाचलला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी इतर आमदारांशी फोनवर संवाद साधला असून सर्वांनी शेवटच्या श्वासापर्यंत केजरीवाल यांच्यासोबत असल्याचं सांगितलंय.

Saurabh Bhardwaj
Agneepath Scheme : अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सभापती राम निवास गोयल, गुलाब सिंह, विनय कुमार आणि शिवचरण गोयल, गुलाब सिंह, दिनेश मोहनिया आणि मुकेश अहलावत यांच्यासह आपचे आठ आमदार दिल्लीत उपस्थित नाहीत. या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या आमदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली होती.

Saurabh Bhardwaj
Arvind Kejriwal : बैठक संपातच सर्व आमदारांना घेऊन केजरीवाल पोहोचले राजघाटवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com