

Saurav Das Claims He Was Stopped at Delhi Airport
esakal
Saurav Das Video: ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात ‘कॉक्रोच चळवळी’वर व्याख्यान देण्यासाठी ब्रिटनला जाणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सह-संयोजक सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी (२४ नोव्हेंबर) दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. पहाटे १ वाजताच्या लंडनला जाणाऱ्या विमानात बसण्यापूर्वी दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर त्यांचा पासपोर्ट अडवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेसाठी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा