yamuna expressway accident
sakal
मंगळवार, १६ डिसेंबरच्या पहाटे यमुना एक्सप्रेसवेवर मथुराजवळ दाट धुक्यामुळे एक भयानक अपघात झाला, ज्यामध्ये १३ लोकांचा जीव गेला. अपघाताचे मुख्य कारण कमी दृश्यमानता (Visibility) हे होते. घटनेच्या वेळी यमुना एक्सप्रेसवेवर आग्रा ते नोएडा मार्गावर १२७ व्या माइलस्टोनजवळ धुक्यामुळे एक मीटरही पाहणे शक्य नव्हते. या अपघातात ८ बस आणि तीन लहान गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या.