

MPPCS Officer
esakal
मध्य प्रदेशातील सिंगरौली महापालिकेच्या आयुक्त आणि एमपीपीसीएस अधिकारी सविता प्रधान यांनी संवेदनशीलतेचे वेगळे उदाहरण घालून दिले आहे. कर्करोगावरील उपचारांमुळे केस गमावलेल्या एका चिमुकलीला आपण एकटी नाही, ही भावना देण्यासाठी त्यांनी स्वतःचे डोके मुंडवले. त्यांच्या या कृतीचे देशभरातून कौतुक होत असून सोशल मीडियावरही त्याची मोठी चर्चा आहे.