

State Bank of India Investigates Suspected Data Leak After Sensitive Personal Details of 3897 Customers Surface on Dark Web
sakal
नवी दिल्ली : इंटरनेटवरील खासगी माहितीच्या सुरक्षेबाबत वारंवार चिंता व्यक्त होत असतानाच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक व संवेदनशील माहिती ‘डार्क वेब’वर उघड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बँकेने या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, डिजिटल प्रमाणपत्रे जारी करणाऱ्या ई-मुद्रा कंपनीच्या ‘क्रिप्टोग्राफिक की’मध्ये त्रुटी आढळून आली आहे. यामुळे इंटरनेटवरील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.