नोटाबंदीचे बॅंकिंग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम : एसबीआय

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या परिणामांची मिमांसा केली. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीचा निर्णय यांनी जाहीर केला. या निर्णयानंतर एक हजार आणि पाचशे हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या.

नोटाबंदीच्या निर्णयाचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे सांगताना "एसबीआय'च्या कारभारालाही या निर्णयाचा फटका बसू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार बॅंकांच्या एकूण ठेवींमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे "एसबीआय'ला इतर खासगी बॅंका, तसेच गृहकर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्था यांच्याशी मोठी स्पर्धा करावी लागते आहे. या सगळ्याचा परिणाम एसबीआयच्या व्याजदरांवरही दिसू लागला आहे. वाढत्या स्पर्धेचा सामना "एसबीआय'ला करता आला नाही, तर फायद्यातही मोठी घट होऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

फसवणुकीचे प्रमाण वाढले
नोटाबंदीनंतर फसवणूक आणि तक्रारींचे निवारण करण्याची प्रकरणे वाढली आहेत. येत्या काळातही अशा प्रकरणांचे आव्हान आहेच. ज्याचा परिणाम बॅंकेचा व्यापार आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. बॅंकिंग क्षेत्रातील तक्रारींमुळे बॅंकिंग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम जाणवत असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sbi marathi news note ban banking