कोरेगाव भीमा दंगल : गौतम नवलखांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Navlakha

२८ ऑगस्ट २०१८ रोजी नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली, पण त्यांना ताब्यात घेण्याऐवजी २८ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर त्यांना त्यांच्याच घरी नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

कोरेगाव भीमा दंगल : गौतम नवलखांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी (Koregaon Bhima) सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी (ता.१२) फेटाळून लावली आहे. नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. 'विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण त्यांच्याकडे नाही,' असे सांगून उच्च न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अबाधित ठेवला आहे. (SC Dismisses Bail Plea of Activist Gautam Navlakha in Koregaon Bhima Case)

हेही वाचा: Corona Update - देशात गेल्या 24 तासात मृत्यूचा उच्चांक

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भावना भडकवणारी भाषणे केल्याने दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. या हिंसाचारातील मुख्य आरोपी गौतम नवलखा यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. नवलखा यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 'अटक केल्यानंतर ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले नाही. त्यानंतर ३४ दिवस त्यांना अटक करून त्यांच्या घरातच ठेवण्यात आले होते, हे कोर्टानेही मान्य केले आहे. त्यामुळे ९० दिवसांची मर्यादा याठिकाणी लागू होत नाही.'

हेही वाचा: लसीचा तुटवडा संपणार; भारताच्या मदतीनं लस उत्पादन करण्याचा अमेरिकेचा विचार

२८ ऑगस्ट २०१८ रोजी नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली, पण त्यांना ताब्यात घेण्याऐवजी २८ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर त्यांना त्यांच्याच घरी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ते सध्या नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहेत. उच्च न्यायालयाच्या एनआयए विशेष कोर्टाच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला नवलखा यांनी १२ जुलै २०२० रोजी आव्हान दिले होते. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर २०१८ रोजी नवलखाना नजरकैदेत ठेवणं बेकायदेशीर ठरवलं होतं.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: Sc Dismisses Bail Plea Of Activist Gautam Navlakha In Koregaon Bhima

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top