
जगातील सर्वात प्रभावी लस उत्पादक कंपनी फायझर भारताच्या संपर्कात आहे. भारतात फायझरच्या लसीला मंजूरी मिळावी, यासाठी चर्चा सुरू आहे. भारतात लस उत्पादन करण्याबाबतही फायझरचा विचार आहे.
लसीचा तुटवडा संपणार; भारताच्या मदतीनं लस उत्पादन करण्याचा अमेरिकेचा विचार
नवी दिल्ली : भारतातील कोरोनाची स्थिती (Corona pandemic) गंभीर होत चालली आहे. त्यामुळे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या कोरोना लसीचे (Johnson and Johnson Covid-19 vaccine) उत्पादन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारख्या (Serum Institute of India) उत्पादक कंपनीचे उत्पादन वाढविण्याबाबत अमेरिका (USA) विचार करत आहे, अशी माहिती अमेरिकेच्या दुतावासाचे प्रभारी डॅनियल बी स्मिथ यांनी दिली. (US looking joint production j&j covid-19 vaccine in India)
हेही वाचा: दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोना का झाला? ICMRनं सांगितलं कारण
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी बायडेन प्रशासन भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन वाढविण्यासाठी कशी गुंतवणूक करायची आणि भारतात जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लसीचे उत्पादन घेण्यासाठी कशी मदत मिळेल याचा विचार अमेरिका करत आहे. बाल्टीमोरमध्ये अॅस्ट्राजेनका लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. पण या प्रकल्पात अनेक अडचणी आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या लसीच्या वापरास आणि निर्यातीस अजून कोणताच दुजोरा दिला नाही. अॅस्ट्राजेनकाचे ६ कोटी डोस पडून आहेत. जर त्याला परवानगी मिळाली तर जगभरातील देशात त्याची निर्यात केली जाऊ शकते. त्यामधील बराच वाटा भारताला मिळणार आहे.
हेही वाचा: भारतीय लष्कर आर्थिक संकटात; उपकरणे भाड्याने घेण्याची आली वेळ
फायझर भारताच्या संपर्कात
जगातील सर्वात प्रभावी लस उत्पादक कंपनी फायझर भारताच्या संपर्कात आहे. भारतात फायझरच्या लसीला मंजूरी मिळावी, यासाठी चर्चा सुरू आहे. भारतात लस उत्पादन करण्याबाबतही फायझरचा विचार आहे. फायझरची लस कोरोनाविरुद्ध सर्वात प्रभावी सिद्ध झाल्याचे अनेक तज्ज्ञांनी मान्य केलं आहे. ही लस कोरोनावर ९२ ते ९५ टक्के कार्यक्षम ठरल्याचे सिद्ध झाले आहे. बीएनटी १६२ बी २ असे या लसीचे नाव असून जागतिक आरोग्य संघटनेनेही या लसीचा प्रभावी आणि सुरक्षित लसींच्या यादीत समावेश केला आहे.
दरम्यान, पुढील काही महिन्यात जगभरातील अनेक कोरोना लसी स्वस्त दरात भारतात उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे लसीकरण मोहिम पूर्ण करण्याबरोबरच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) बचत होईल. लस उत्पादनात भारताच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Web Title: Us Looking Joint Production Johnson And Johnson Covid 19 Vaccine In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..