Supreme Court : गुन्ह्याची मागणी करणारी याचिका फेटाळली; न्यायाधीश वर्मा प्रकरण
Justice Yashwant Verma : न्यायाधीश यशवंत वर्मांविरोधात सरकारी निवासस्थानातील आगीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली.
नवी दिल्ली : सरकारी निवासस्थानी लागलेल्या आगीत बेहिशोबी नोटा जळाल्याच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.