
नवी दिल्ली : मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीने एक वर्ष तुरुंगवास भोगायला हवा असा कोणताही नियम नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आज एका उद्योजकास जामीन मंजूर केला. न्या. अभय.एस.ओक आणि न्या. उज्जल भुयान यांच्या पीठाने दोन हजार कोटी रुपयांच्या मद्य गैरव्यवहार प्रकरणी उद्योजक अन्वर धेबार यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीने तुरुंगातच राहायला हवे असा कोणताही नियम नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.