Rahul Gandhi : सावरकरांवरील टीकेवरून राहुल यांना फटकारले
Supreme Court : स्वातंत्र्यसैनिकांविषयी बेजबाबदार विधान करू नका, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिला आहे. सावरकरांवरील टीकेच्या प्रकरणी लखनौ न्यायालयाच्या समन्सला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
नवी दिल्ली : ‘‘स्वातंत्र्य सैनिकांविरोधात बेजबाबदार विधाने करू नका, अन्यथा भविष्यात अशा विधानांची आम्ही स्वत:हून दखल घेऊ,’’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना फटकारले.