Chenab Bridge
sakal
- नितीन बिनेकर
जम्मू - एका बाजूला आकाशाला भिडणारी भव्य कमान, खाली खोल दरीतून वाहणारी चिनाब नदी आणि सभोवताली हिमालयाच्या उंच डोंगररांगा... जम्मू-काश्मीरमधील चिनाब पुलाचे हे विहंगम रूप आता पर्यटकांना जवळून अनुभवता येणार आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवरप्रमाणे या भव्य वास्तूचे दर्शन घेता यावे, यासाठी पुलाच्या परिसरात संग्रहालय आणि व्ह्यूइंग डेक उभारण्यात येत आहेत. संग्रहालयाचे काम सध्या सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर या सुविधांमुळे चिनाब पुलाच्या पर्यटन आकर्षणात भर पडणार आहे.