सरकारचा मोठा निर्णय: शाळेपासून २ किमी अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार सायकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारचा मोठा निर्णय: शाळेपासून २ किमी अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार सायकल

सरकारचा मोठा निर्णय: शाळेपासून २ किमी अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार सायकल

हरियाणा शिक्षण विभाग सरकारी शाळांमधील 9 आणि 11 वी च्या वर्गात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सायकली वाटणार आहे. सायकल योजनेचा लाभ फक्त अशाच विद्यार्थ्यांना मिळणार आहे, ज्या विद्यार्थांची शाळा त्यांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरापेक्षा जास्त आहे. गुरुग्राममधील सिव्हिल लाइन्स भागात असलेल्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात 20 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय सायकल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात जिल्ह्यातील चारही गटातील एससी प्रवर्गातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सायकल खरेदीसाठी 3100 आणि 3300 रुपये किमत विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या योजनेनुसार, अनुसूचित जातीच्या इयत्ता 9 आणि 11 वीच्या अशा विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येणार आहे, ज्यांच्या गावात 9 आणि 11 वीची शाळा नाहीत. हे विद्यार्थी त्यांच्या गावापासून दोन किलोमीटर पुढील अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावाती शाळेत जातात. जिल्हास्तरीय मेळाव्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची सायकल निवडता येणार आहे.

हेही वाचा: 8 चित्ते आले, 8 वर्षातील नोकऱ्या का नाही आल्या? राहुल गांधींचा मोदींना सवाल

शिक्षण विभागाने 20 इंची सायकलसाठी 3100 रुपये आणि 22 इंची सायकलसाठी 3300 रुपये रक्कम निश्चित केले आहे. GST सह या सायकलींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. विभागाने निश्चित केलेल्या किमती पेक्षा जास्त किमतीची सायकल खरेदी करायची असल्यास बाकीची रक्कम पालकांना भरावी लागणार आहे.

जिल्हा शिक्षण विभागाचे सहाय्यक शिक्षणाधिकारी जगदीश अहलावत यांनी सांगितले की, सायकल विक्रेत्यांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 20 सप्टेंबर रोजी शासकीय वरीष्ठ माध्यमिक शाळा सिव्हिल लाइन्समध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी विक्रेते सायकल उपलब्ध करून देतील.

Web Title: School Two Kilometers Home Haryana Government Cycles Students Class

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..