सहा महिन्यांनंतर वर्ग भरले;केंद्राच्या निर्देशानुसार काही राज्यांमधील शाळा सुरू

वृत्तसंस्था
Tuesday, 22 September 2020

केंद्र सरकारने ‘अनलॉक-४’मध्ये शाळेतील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्‍याप्रमाणे जम्मू-काश्‍मीर, आसाम, हरियाना आदी राज्यांमधील काही शाळा सोमवारी सुरू झाल्या.

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे देशातील शाळा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. केंद्र सरकारने ‘अनलॉक-४’मध्ये शाळेतील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्‍याप्रमाणे जम्मू-काश्‍मीर, आसाम, हरियाना आदी राज्यांमधील काही शाळा सोमवारी सुरू झाल्या. मात्र बहुतेक राज्यांत ‘शाळा बंद’च आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जम्मूमध्ये आज रणबीर उच्च माध्यमिक शाळा सुरू झाली. ‘‘संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण केले असून औषधी फवाराही मारला आहे. शाळेत सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल,’’ असे या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जम्मूतील केंद्रीय विद्यालयही सुरू झाले असून श्रीनगरमधील शाळेत विद्यार्थ्यांनी आज हजेरी लावली. तेथील एका विद्यार्थ्याने शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘‘नियमांचे पालन करताना शिक्षकांनी खूप मदत केली. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे,’’ असे तो म्हणाला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in Jammu and Kashmir, Assam and Haryana opened on Monday

Tags
टॉपिकस
Topic Tags: