संभाव्य कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी शाळा सज्ज

दिल्लीत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे; विलगीकरण खोल्या, नियमित तपासणी
Schools ready to face corona waves new delhi rules inquiring about the status of students and their families
Schools ready to face corona waves new delhi rules inquiring about the status of students and their familiessakal

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा कहर वाढत असतानाही राज्य सरकारने शाळा सुरू ठेऊन संभाव्य कोरोना लाटेचा सामना करण्याची तयारी केली आहे. शाळा बंद न करता या कोरोनाचा सामना कसा करायचा, यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये विलगीकरण खोल्या करण्यापासून ते शिक्षकांना दररोज विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची स्थितीची चौकशी करण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.

राजधानीतील शाळा कोरोनामुळे बंद केल्या जाणार नाहीत, असा निर्णय दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वी घेण्यात आला होता. आता शाळांसाठी कोरोनाविषयक प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. त्याआधारे शाळांमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी तयारी केली जाईल. दिल्ली सरकारने आज ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केला आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्याशी नियमित बैठका घ्या आणि कोरोना प्रतिबंधाबाबत चर्चा करा. तसेच, मुले आणि पालकांमध्ये लसीकरणास प्रोत्साहित करा, असे त्यात म्हटले आहे. शाळाप्रमुखांनी आवश्यक असेल, तेव्हा मुलांच्या उपस्थितीसाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पालक आणि शिक्षकांच्या बैठका घ्याव्यात. सर्व कर्मचारी आणि मुलांचे लसीकरण हे शाळेचे पहिले प्राधान्य असले पाहिजे.

प्रत्येकाने मास्क परिधान केला आहे याची खात्री केली पाहिजे. वॉश बेसिन आणि पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. मुलांच्या प्रवेशाच्या आणि बाहेर पडण्याच्या वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी शाळाप्रमुखांची आहे. जेवणाचा डबा एकमेकांना शेअर न करणे, असे सूचित केले आहे.

पालकांनाही सूचना

प्रवेशद्वारावर कर्मचारी तैनात करावेत जेणेकरून कोविडची लक्षणे असलेल्या मुलांना किंवा कर्मचाऱ्यांना तेथून घरी पाठवता येईल. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचे थर्मल स्कॅनिंग गेटवरच केले पाहिजे. शाळा, वर्गखोली, प्रयोगशाळा आणि स्वच्छतागृहात प्रवेश करतानाच हात धुणे बंधनकारक असेल. पालकांनी त्यांच्या घरातील कोणाला कोविडची लक्षणे आढळल्यास मुलाला शाळेत पाठवू नका, अशा सूचना पालकांसाठी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com