esakal | ...म्हणून शाळा सुरु करायला हव्यात; AIIMS प्रमुखांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

randeep guleria

भारतातील मोठ्या लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, पण अजून लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरुन विशेषत: लहान मुलांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

...म्हणून शाळा सुरु करायला हव्यात; AIIMS प्रमुखांचा सल्ला

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतातील मोठ्या लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, पण अजून लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरुन विशेषत: लहान मुलांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आशादायक वक्तव्य केलं आहे. ते म्हणालेत की पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबत विचार करायला हवा. एका न्यूज चॅनेलला बोलताना ते म्हणाले की, आता आपल्याला पुन्हा शाळा सुरु करण्याबाबत विचार करायला हवा. (Schools should be reopened suggests AIIMS director Dr Randeep Guleria corona)

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या जवळपास दीड वर्षांपासून देशभरातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावं लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. काही काळ 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. गुलेरिया म्हणाले की, ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, त्याठिकाणी शाळा सुरु करता येतील. 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरु करता येईल.

हेही वाचा: विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

गुलेरिया असंही म्हणाले की, कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका असेल तर तात्काळ शाळा बंद करायला हव्यात. पण, विद्यार्थ्यांना अल्टरनेट पद्धतीने शाळेत बोलावलं जाऊ शकतं किंवा अन्य प्रकारची योजना बनवली जाऊ शकते. मुलांच्या विकासासाठी शाळा अत्यावश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण सर्वांना उपलब्ध नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हेही वाचा: Aashadi Wari 2021: उपवासाच्या खमंग पदार्थांची रेसिपी

भारतात खूप कमी लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्यामध्ये इम्युनिटी चांगली असल्याने ते लवकर बरे होत आहेत. लहान मुलांमध्ये वयस्कर लोकांपेक्षा चांगल्या अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे शाळा सुरु करायला हव्यात, असं गुलेरिया म्हणाले. डिसेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांसाठी लस उपलब्ध होईल. लहान मुलांवरील कोवॅक्सिन लशीच्या ट्रायलचे रिझल्ट चांगले आहेत. भारत बायोटेकचे परिक्षण यशस्वी ठरल्यास 2 वर्षांपुढील मुलांचे लसीकरण सुरु होईल, असंही ते म्हणाले.

loading image