
महामार्गावर कुरेभरजवळ ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. या धावपट्टीवर सर्व प्रकारची विमाने उतरू शकतात. हवाई दलही धावपट्टीची लवकरच चाचणी घेण्याची शक्यता आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचल महामार्गावर ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, महामार्गावर लढाऊ विमानांच्या आपत्कालिन वापरासाठी दोन धावपट्ट्या असणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत माहिती देताना उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी म्हणाले, की पूर्वांचल महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे, महामार्गावर कुरेभरजवळ ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. या धावपट्टीवर सर्व प्रकारची विमाने उतरू शकतात. हवाई दलही धावपट्टीची लवकरच चाचणी घेण्याची शक्यता आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विशेष म्हणजे, या धावपट्टीमुळे उत्तर प्रदेश महामार्गावर दोन धावपट्ट्या असणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. लखनौ - आग्रा महामार्गावर राज्याची पहिली तर पूर्वांचल महामार्गावर दुसरी धावपट्टी आहे. हवाई दलाच्या मिराज २०००, जग्वॉर, सुखोई ३० आणि सुपर हर्क्युलस आदी लढाऊ विमाने लखनौ - आग्रा महामार्गावर यशस्वीरित्या उतरलेली आहेत. संपूर्ण उत्तर भारत महामार्गांनी उर्वरित देशाशी जोडण्याचा उत्तर प्रदेश सरकारच प्रयत्न आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महामार्गावर धावपट्टी कशासाठी?
लढाऊ विमानांचे आपत्कालिन परिस्थितीत लॅडिंग व टेक ऑफ करण्यासाठी महामार्गावर अशा धावपट्ट्या तयार केल्या जातात. चीन, पाकिस्तानविरुद्ध युद्धजन्य परिस्थिती उद्भवलीच तर या धावपट्ट्यांचा वापर केला जाऊ शकतो.