८८ वर्षांनंतर उघडणार का ताजमहालचे २२ दरवाजे ? काय असेल त्यामागील रहस्य ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tajmahal

८८ वर्षांनंतर उघडणार का ताजमहालचे २२ दरवाजे ? काय असेल त्यामागील रहस्य ?

मुंबई : ताजमहालातील (TAJMAHAL) २२ दालने उघडली जावीत अशी मागणी करणारी याचिका भाजप नेता डॉ. रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर दाखल केली आहे. याचिका दाखल झाल्यानंतर ताजमहालातील या २२ दालनांबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भविष्यात ही दालने उघडली गेलीच तर त्यातून कोणते रहस्य उलगडेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.

हेही वाचा: ...संसद भवन आणि ताजमहाल विकणारा मि. नटवरलाल!

ताजमहालचा मुख्य मकबरा आणि चमेली फर्शच्या खाली २२ दालने बंद अवस्थेत आहेत. ही दालने मुघल काळापासून बंद आहेत. त्यांची अवस्था कशी आहे हे पाहाण्यासाठी १९३४ साली या दरवाज्यांचे निरीक्षण करण्यात आले होते; मात्र या घटनेचा उल्लेख कुठेही आढळत नाही.

चमेली फर्शवर यमुना किनाराजवळ तळघरात जाण्यासाठी जिने आहेत. त्यावर लोखंडी जाळ्या लावून ते बंद करण्यात आले आहेत. ४० ते ४५ वर्षांपूर्वी जिन्यावरून खाली जाण्याचा मार्ग खुला होता. ही २२ दालने ८८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९३४ साली उघडण्यात आली होती. त्यानंतर २०१५ साली डागडुजीसाठी काही दालने गुप्तरित्या उघडण्यात आली होती. आता ही दालने पूर्णपणे उघडली गेली तर काहीतरी रहस्य उलगडण्याची शक्यत आहे.

हेही वाचा: लाेटस टेंपल : 20 व्या शतकातील ताजमहाल

इतिहासकार पीएन ओक यांच्या 'ट्रू स्टोरीज ऑफ ताज' या पुस्तकापासून ताजमहाल वादात सापडला. ताजमहाल म्हणजे पूर्वी शंकराचे मंदिर असल्याचा दावा त्यांनी या पुस्तकात केला आहे. येथे त्यांनी गणपती, कमळ आणि साप यांच्या आकृत्याही निदर्शनास आणल्या होत्या.

जयपूर येथील सिटी पॅलेसमधील अभिलेखानुसार ताजमहालचा संबंध राजा मानसिंगशी आहे. यात म्हटल्याप्रमाणे, राजा मानसिंगच्या हवेलीच्या बदल्यात शाहजहानने राजा जयसिंगला चार हवेल्या दिल्या होत्या. शाहजहानने राजा जयसिंगकडून संगमरवर मागवल्याची नोंद आहे; मात्र जेवढा संगमरवर मागवला गेला होता त्याने ताजमहालची निर्मिती होऊ शकत नाही.

२०१५ साली लखनऊचे हरिशंकर जैन आणि अन्य एकाच्या वतीने अधिवक्ता राजेश कुलश्रेष्ठ यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात ताजमहालाला लॉर्ड श्रीअग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजोमहालय मंदिर म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. याला बटेश्वर येथे मिळालेल्या राजा परिमार्दिदेवच्या शिलालेखाचा आधार होता. २०१७ साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने ताजमहालात शंकराचे मंदिर असण्याची शक्यता नाकारली आहे. त्यानंतर ही याचिका रद्द ठरवण्यात आली.

Web Title: Secret In The Tajmahals Rooms Whether There Was Any Temple Of God Shankar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :taj mahal
go to top