
नवी दिल्ली येथील नवीन संसद भवनात आज सकाळी एका घुसखोराने भिंत चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनुसार, हा व्यक्ती सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास रेल भवनाच्या बाजूने झाडाच्या सहाय्याने भिंत चढून संसदेत घुसला आणि गरुड गेटपर्यंत पोहोचला. मात्र, संसदेतील सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.