जम्मू काश्मीर: दोन दहशतवाद्यांसह तिघे ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu-Kashmir

जम्मू काश्मीर: दोन दहशतवाद्यांसह तिघे ठार

जम्मू काश्मीर: हैदरपोरा भागात सोमवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तिघांना ठार केलं. यामध्ये दोन दहशतवादी तर एक त्यांना मदत करणाऱ्या घराच्या मालकाचाही समावेश आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये त्रालच्या अमीर तांत्रे आणि बनिहालच्या अमीर नावाच्या एकाचा समावेश आहे. तर अल्ताफ हे त्या घराच्या मालकाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: स्वदेशी बनावटीच्या तोफेमुळे भारत संरक्षण क्षेत्रात सक्षम

ठार झालेल्या तिघांच्या नावाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. चकमकीमुळे काही काळ श्रीनगर-बारामुल्ला मार्गावर वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. सर्व वाहतुक दुसऱ्या मार्गाने वळवली होती.

हेही वाचा: हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला पाठवली गोपनीय माहिती; जवानाला अटक

काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याआधारे परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना घरात लपल्याचे पाहून जवानांनी त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं, मात्र दुसऱ्या बाजूने गोळीबार सुरू झाला. यावेळी प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात जवानांनी तिघांना ठार केलं.

loading image
go to top