काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याची होणार चौकशी; चारशे कोटींचे प्रकरण

वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

कॉंग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल हे अडचणीत सापडले असून त्यांची चौकशी होणार आहे. त्यांना आयकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल हे अडचणीत सापडले असून त्यांची चौकशी होणार आहे. त्यांना आयकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. पटेल यांना 400 कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणात नोटीस देण्यात आली असून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयकर विभागाच्या विविध कंपन्यांद्वारे कॉंग्रेस पक्षाला पाठविलेल्या 400 कोटी रुपयांहून अधिक ट्रान्सजॅक्शनचा तपास केला जात आहे. यापूर्वी आयकर विभागाने अहमद पटेल यांना 11 फेब्रुवारी रोजी समन्स जारी केलं होते. 14 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. हे समन्स  आय टी अॅक्ट सेक्शन 131 अंतर्गत जारी करण्यात आले आहे. परंतु, अहमद पटेल 14 फेब्रुवारी रोजी प्रकृती बरी नसल्याने बाजू मांडू शकले नाहीत. श्वासनाच्या त्रासाचे कारण त्यांनी सांगितले होते.

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत वाचली एक कविता; कोणाची कविता? काय आहे कारण?

यापूर्वीही काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचेही नाव अशा प्रकारच्या घोटाळ्यात आल्यानंतर काँग्रसला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अहमद पटेल यांची चौकशी होणार असल्याने काँग्रेससमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पी. चिदंबरम यांच्याविरोधातील तपास सुरू आहे तो पर्यंत अहमद पटेल यांचीही चौकशी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Congress leader Ahmed Patel summoned by Income Tax Department