ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

5 डिसेंबर रोजी लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Vinod Dua
Vinod DuaANI

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ (Senior Journalist Vinod dua ) यांचे शनिवारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका (Vinod Dua Daughter Mallika) दुआ हिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. 5 डिसेंबर रोजी विनोद दुआ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मल्लिका दुआ यांनी सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, बेधडक, निडर आणि असाधारण वडील विनोद दुआ यांचे निधन झाले. दिल्लीच्या निर्वासित वसाहतीतून पत्रकारितेच्या शिखरावर पोहोचणारे ते अनोखे जीवन जगले. ते नेहमी सत्य सांगत राहिले.

विनोद दुवा यांनी जवळपास 42 वर्षाहून पत्रकारिता क्षेत्रात काम केले आहे. सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत निवडणुकांचे विश्लेषण करण्यास विनोद दुवा यांनी सुरुवात केली. त्यानंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये हा ट्रेन्ड सुरु झाला.

1996 मध्ये त्यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. जून 2017 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मुंबई प्रेस क्लबतर्फे रेडइंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com