
पोलिस निरीक्षक कॉन्स्टेबलला म्हणाला; मला तू खूप आवडते, फक्त...
‘मला तू खूप आवडते, मला एका रात्रीचा आधार हवा आहे’ अशी मागणी वरिष्ठा पोलिस निरीक्षकाने (Senior Police Inspector) महिल कॉन्स्टेबलला (Female constable) केली. पोलिस विभागाला लाजवेल असे कृत्य राजस्थामधील जालोर जिल्ह्यातील भीनमाल पोलिस स्टेशनमध्ये घडली. दुलीचंद गुर्जर असे आरोपी वरिष्ठा पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. आपल्या चेंबरमध्ये बोलावून अशी मागणी केल्याचा आरोप महिला कॉन्स्टेबलने केला आहे. (Police inspector demanded physical contact)
भीनमाल पोलिस स्टेशनचे अधिकारी दुलीचंद गुर्जर यांनी मला एकत्र रात्र घालवण्याची मागणी केल्याचे महिला कॉन्स्टेबलने (Female constable) पोलिस अधीक्षकांना सांगितले. यानंतर पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठा पोलिस निरीक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिस अधीक्षकांनी दुलीचंद गुर्जर व्यतिरिक्त सहाय्यक उपनिरीक्षक आणि इतर दोन हवालदारांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश दिले. दुलीचंद गुर्जर हे यापूर्वीही अनेक वादात सापडले आहे.
हेही वाचा: कुजलेल्या नावेने केला घात; बॅक वॉटरमध्ये नाव मधातून तुटली
१७ तारखेला दुलीचंद गुर्जर (Senior Police Inspector) यांनी मला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले. ‘मला तू खूप आवडते’ असे म्हणत एक रात्र घालवण्याची मागणी करून दबाव (demand physical relation) टाकला. गुर्जर यांनी महिला कॉन्स्टेबलवर (Female constable) एका रात्रीसाठी दबाव टाकला तेव्हा महिला कॉन्स्टेबलने पोलिस ठाण्यात असलेल्या असिस्टंट पोलिससह कॉन्स्टेबलला ही बाब सांगितली. मात्र, सर्वांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी सहायक निरीक्षकासह चार हवालदारांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
Web Title: Senior Police Inspector Female Constable Demand Physical Relation Crime News Rajasthan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..