esakal | सीरियल किलर डॉक्टरने केली 100 जणांची हत्या, अनेक कॅब चालकांचे मृतदेह नाल्यात फेकल्याची कबूली
sakal

बोलून बातमी शोधा

crime, Devendra Sharma

वाहनाची चोरी करण्यासाठी चालकाची हत्या करुन त्याचा मृतदेह तो नाल्यामध्ये फेकून द्यायचा.

सीरियल किलर डॉक्टरने केली 100 जणांची हत्या, अनेक कॅब चालकांचे मृतदेह नाल्यात फेकल्याची कबूली

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

डॉक्टरी पेशातील राक्षसीकृत्य करणाऱ्या देवेंद्र शर्मासंदर्भात आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी 50 हत्या करण्याची कबूली देणाऱ्या सीरियल किलर डॉक्टर देवेंद्र शर्माने जवळपास 100 लोकांची हत्या केली आहे. त्याने खुद्द याची कबूली दिली आहे. यातील अनेक लोकांचा मृतदेह त्याने युपीतील नाल्यात टाकून मगरमच्छला खाद्य म्हणून टाकल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र शर्माला दिल्लीत अटक करण्यात आली होती. किडनी तस्करी प्रकरणात 16 वर्षांपासून तुरुंगात असलेला देवेंद्र शर्मा 20 दिवसांच्या पे रोलवर बाहेर आल्यानंतर तो पसार झाला होता. अटकेनंतर आता त्याच्या क्रुरकृत्यासंदर्भातील आणखी काही गोष्टी समोर येत आहेत.     

अयोध्येत लॉकडाउनजन्य परिस्थिती; बाहेरच्यांना प्रवेशबंदी​

गॅस एजेन्सीत चोरीच्या सिलेंडरचा साठा 

गुंतवणूकीत झालेल्या फसवणूकीनंतर राजस्थानमध्ये डॉक्टरी करणारा देवेंद्र शर्मा गुन्हेगारीकडे वळला. त्याने  डॉक्टरीसोबत किडनी तस्करीचा प्रकार सुरु केला. यासोबतच गॅस डिलिव्हरी करणाऱ्या ट्रकची लूट करत तो अनाधिकृत गॅस एजन्सीही चालवायचा. चोरीची वाहने विकण्याचा उद्योगही त्याने सुरु केला होता.  

 चालकांची हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकायचा
वाहनाची चोरी करण्यासाठी चालकाची हत्या करुन त्याचा मृतदेह तो नाल्यामध्ये फेकून द्यायचा. दिल्ली ते यूपी प्रवासासाठी तो कॅब बूक करायचा. रस्त्यात चालकाची हत्या करत त्या वाहनाची विक्री करण्याच उद्योग तो करायचा. त्यांची एक गँग यात सक्रीय होती. पोलिस तपासात दिलेल्या माहितीनुसार, अनेक कॅब चालकांचे मृतदेह त्याने उत्तर प्रदेशमधील कासगंजच्या हजारा नाल्यातच फेकून दिल्याची कबूली त्याने दिली आहे.  

अमेरिकेच्या इतिहासात जे घडलं नाही त्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट

 शर्माला बुधवारी दिल्लीत अटक करण्यात आली. त्याने 1984 आर्युवेदिक मेडिसिनमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजस्थानमध्ये क्लिनिक उघडले होते. 1994 मध्ये त्याने गॅस एजन्सीसाठी एका कंपनीत 11 लाख रुपयांची गुंतवणूक केली. पण ही कंपनी त्याचे पैसे घेऊन गायब झाली. फसवणूकीनंतर त्याने 1995 अनाधिकृत गॅस एजन्सी सुरु केली. त्याने एक टोळी तयार करत  एलपीजी सिलेंडर घेऊन जाणारे ट्रॅक लुटण्यास सुरुवात केली. यासाठी ते ट्रक चालकाची हत्या करायचे. गॅस सिलेंडरची चोरी करुन ही टोळी ट्रॅकचीही विल्हेवाट लावयची. या टोळीच्या साथीने त्याने जवळपास 24 लोकांची हत्या कील. त्यानंतर देवेंद्र शर्मा किडनी तस्करांच्या ताफ्यात सामील झाला. त्याने  सात लाख प्रति ट्रांसप्लांटप्रमाणे जवळपास 125 ट्रांसप्लांट केले. याशिवाय कॅब चालकांची हत्या करुन त्यांची वाहने लटण्याचा प्रकारही त्याने केला. 2004 मध्ये त्याचे राक्षसी कृत्य समोर आले. 16 वर्षांपासून तो जयपुरच्या तरुंगात शिक्षा भोगत आहे. जानेवारी 2020 रोजी 20 दिवसांच्या पे रोलवर तो बाहेर आला होता. त्यानंतर तो काही दिवस भूमीगत होता. अखेर पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली.