
हार्दिक पटेलवर काँग्रेसचा गंभीर आरोप; आम्ही सन्मान दिला तर...
पाटीदार नेता हार्दिक पटेल (Hardik Patel) काँग्रेसमध्ये असताना भाजपच्या (BJP) संपर्कात होते. ते पक्षात सेलिब्रिटीच्या शैलीत काम करीत होते, असा आरोप गुजरात काँग्रेसचे (Congress) प्रभारी रघु शर्मा यांनी बुधवारी (ता. १) केला. हार्दिक पटेल यांनी २ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे दरम्यान, काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. (Serious allegations of Congress against Hardik Patel)
आम्ही सहा महिन्यांपासून पाहत होतो. पक्षाच्या कार्यक्रमांना ते सेलिब्रिटीसारखे येत असत. पक्षाचे कार्यक्रम करायचे आणि ते भाषण करायचे आणि निघून जायचे. त्यांनी कार्यक्रमात येऊन सहभागी व्हावे याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, त्यांचे वागणे योग्य नव्हते, असे रघु शर्मा यांनी हार्दिक पटेल यांच्यावर ताशेरे ओढताना म्हटले.
हेही वाचा: मोदी म्हणाले, भाजपमध्ये असत्या तर तुम्हाला निवडणूक लढवायला लावले असते
रघु शर्मा यांनी विचारले की, हार्दिक पटेल हे भाजपमध्ये का आले? अचानक असे काय झाले की पाटीदार आंदोलनादरम्यान त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाऊ लागले? तीन वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आणि पक्षाने त्यांना कार्याध्यक्ष बनवले.
काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी पाटीदार समाजाचे मत घेतले होते का? असे काय घडले की हार्दिक पटेलने (Hardik Patel) काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. ५ राज्यांच्या निवडणुकीत पक्षाने हार्दिक पटेलला स्टार प्रचारक बनवले होते. मात्र, त्यांनी फसवणूक केल्याचे शर्मा म्हणाले.
हेही वाचा: हैदराबादमध्ये भाजपची बैठक; केसीआर यांना उत्तर देण्याची तयारी
काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप
हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना पक्ष जनतेचे खरे मुद्दे घेत नाही आणि तो भरकटल्याचा आरोप केला होता. काँग्रेस नेतृत्व मोठ्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोपही हार्दिक पटेल यांनी केला होता. इतकेच नाही तर त्यांनी काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला होता. यानंतर ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांनी स्वत:ला रामभक्तही म्हटले होते.
Web Title: Serious Allegations Of Congress Against Hardik Patel Already In Touch With Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..