हिंसाचार न थांबल्यास गंभीर परिणाम; भाजप नेत्याकडून इशारा

निवडणुकीनंतर बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला सत्तारुढ ‘तृणमूल’च जबाबदार आहे आणि हा हिंसाचार न थांबल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा भाजपच्या नेत्याने दिला आहे.
JP Nadda
JP NaddaSakal

नवी दिल्ली - निवडणुकीनंतर बंगालमध्ये (West Bengal) उसळलेल्या हिंसाचाराला (Violence) सत्तारुढ ‘तृणमूल’च (TMC) जबाबदार आहे आणि हा हिंसाचार न थांबल्यास गंभीर परिणाम (Effect) होतील, असा इशारा भाजपच्या नेत्याने (BJP leader) दिला आहे. आपल्यालाही कधी ना कधी दिल्लीत यावेच लागणार आहे, हे त्या पक्षाच्या आमदारांनी, खासदारांनी लक्षात ठेवावे, असा इशारा भाजपचे खासदार प्रवेश साहिबसिंह वर्मा (Pravesh Sahebsing Verma) यांनी दिला. (Serious consequences if violence does not stop Warning from BJP leader)

दरम्यान, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये धाव घेतली. ज्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले झाले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे सत्र सुरू केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या (ता.५) पुन्हा शपथ घेतील आणि त्याच दिवशी देशभरात भाजपने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपला, ‘असेच कोरोना सुपरस्प्रेडर कार्यक्रम’ राबवा असा टोलाही लगावला आहे. खासदार प्रवेश वर्मा यांनी, निवडणुकीत जय-पराजय होतो, खूनखराबा नाही, असे म्हटले आहे. भाजप प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अनिल बनुनी यांनीही बंगालमधील हिंसाचारावर टीका केली आहे. पक्षाचे राज्यसभेतील नेते भूपेंद्र यादव यांनी सांगितले, की भाजप कार्यकर्त्यांचे हे बलिदान वाया जाऊ देणार नाही.

JP Nadda
परदेशातून येणारी मदत राज्यांना वेळेत मिळेना!

गृहमंत्रालय सक्रिय

भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी कथित हिंसाचार प्रकरणी गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली. गृह मंत्रालयाने या हिंसाचाराबद्दल राज्य सरकारकडे विचारणा केली. राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवले आहे. निवडणुकीनंतर झालेल्या घटनांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, असेही निर्देश पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com