मोठी बातमी! सीरमची कोरोना लस सर्वसामान्यांच्या आवाक्यात

vaccine_6.jpg
vaccine_6.jpg

नवी दिल्ली- सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) ऑफ इंडियाने शुक्रवारी म्हटलं आहे की, भारत आणि अन्य कमी व मध्यम उत्पन्नगटातीस देशांसाठी कोविड-19 लसीचे (Vaccine) 10 करोड डोस उत्पादन करण्यासंदर्भात गावी (GAVI) आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन सोबत करार केला आहे. हा करार सीरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनात मोठी फायद्याची ठरणार आहे. जेव्हा लसीला नियामक मंडळ किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळेल तेव्हा 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात भारत आणि इतर अल्प उत्पादन गटातील देशांसाठी पुरसे डोस उत्पादित केले जातील, असं सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलं आहे.  

कोरोनाविरोधात 'चमत्कारिक लस' तयार केल्याचा इस्त्राईलचा दावा

सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीची किंमत तीन डॉलर म्हणजे जवळजवळ 225 रुपये असणार आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने गावीला 15 कोटी डॉलर जोखिम-रहित-निधी देऊ करणार आहे. याचा उपयोग सीरम इंन्स्टिट्यूटच्या लस निर्मितीसाठी आणि कमी व मध्यम उत्पन्न देशांना लस खरेदीसाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे.  सीरम कंपनी लस निर्मितीमध्ये अपयशी ठरली तर सर्व खर्च गावी करणार आहे. याचा अर्थ लस बनवताना कंपनीला नुकसान झाल्यास तो खर्च जोखिम निधी अंतर्गत गावी करणार आहे. 

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बनणाऱ्या लसीला कोविशील्ड (Covishield) असं नाव देण्यात आले आहे. कंपनीने लसीच्या पुरवढ्यासाठी 30 जूलै रोजी लस निर्मिती करणारी अमेरिकी कंपनी नोवावैस्क इंक (Novavax Inc)सोबत भागिदारी केली आहे. 

जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला म्हणाले की, कोविड-19 विरोधातील आपली लढाई मजबूत करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने भारत आणि इतर कमी उत्पन्न गटातील देशांसाठी 10 करोड लसींचे डोस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावि आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी करार करण्यात आला आहे. 

सीरम इन्स्टिट्यूट आणि त्याच्या वैश्विक भागिदारीमुळे खूष असल्याची प्रतिक्रिया भारत सरकारचे जैव बायोटेक्लॉलोजीचे सचिव रेणु स्वरुप म्हणाले आहेत. भारताजवळ केवळ भारतच नाही तर जगासाठी सुरक्षित आणि परवडणारी लस निर्माण करण्यासाठी एक प्रमाणित रिकॉर्ड असल्याचंही ते म्हणाले आहेत.

(edited by-kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com