Indore : एकाच खाजगी कंपनीतील तब्बल सात कर्मचाऱ्यांनी केलं विषप्राशन , कंपनी मालक फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seven employes ate poison in from one company

Indore : एकाच खाजगी कंपनीतील तब्बल सात कर्मचाऱ्यांनी केलं विषप्राशन , कंपनी मालक फरार

इंदोरच्या एका खाजगी कंपनीत एका वेळी तब्बल सात कर्मचाऱ्यांनी विषप्राशन केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. नोकरीवरून काढून टाकलं म्हणून संतापून या कर्माचाऱ्यांनी विषप्राशन केलंय. ही घटना इंदोरच्या परदेसी पुरा ठाणे क्षेत्रात आज सकाळी घडली असून आत्महत्या करण्याच्या हेतून या कर्मचाऱ्यांनी एका वेळी विषारी पदार्थाचं सेवन केलं होतं. (Seven employes ate poison in from one company )

एका खाजगी कंपनीने सात कर्मचाऱ्यांना एका वेळी कामावरून बाहेर काढल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलत स्वत:चा जीव धोक्यात टाकलाय. या सगळ्या कर्मचाऱ्यांना इंदोरच्या एमवाय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कंपनीचे मालक रवी बाफना आणि पुनीत अजमेरा फरार सून पोलीसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या सात कर्मचाऱ्यांची स्थिती फार नाजूक असल्याचं सांगितलं जातंय. कंपनीच्या मालकाने नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीत घेणार असल्यांच सांगितलं होतं. मात्र असे न झाल्याने त्रस्त कर्मचाऱ्यांनी हे टोकाचं पाऊल घेतलं असल्याचे कर्मचाऱ्यांच्या नातलगांचे म्हणणे आहे. कंपनीच्या मालकाने या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढत बाणगंगाच्या कंपनीत जाण्यास सांगितले होते. तिथे गेल्यावर मात्र त्यांना सुट्ट्यांवर जा असं सांगण्यात आलं. आणि या कर्मचाऱ्यांच्या जागी दिल्ली, मुंबई, कोलकातावरून दुसरे कर्मचारी भरले गेले. वैतागून सातही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत हे पाऊल उचललं.

हेही वाचा: Crime : पाय लागला म्हणून प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून फेकले; घटनेने खळबळ

या सातही कर्मचाऱ्यांना मागल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. पगाराची मागणी करूनही त्यांना पगार तर मिळाला नाहीच पण त्यांना कंपनीतून काढण्यात आलं. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे या सगळ्या कर्मचाऱ्यांची स्थिती सुधारली असून हे कर्मचारी पोलीसांना साक्ष देण्याच्या स्थितीत आहेत.

Web Title: Seven Employs Ate Poison Together At Indore Private Company Taken This Step As Owner Fired Them

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..