Madhya Pradesh Seep river
Madhya Pradesh Seep river

MP Boat Capsized: वादळाने केला घात! बोट उलटून एकाच कुटुंबातील 7 जणांना जलसमाधी, 5 लहान मुलांचा समावेश

जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. यात चार लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.

Madhya Pradesh Boat Capsized: मध्य प्रदेशच्या श्योमपुर जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. १ जून रोजी सीप नदीमध्ये एक बोट उलटून पाच लहान मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोट आठ जणांना घेऊन जात होती. त्यावेळी हा अपघात घडला.

जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. यात चार लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. सात मृतांपैकी ४ ते १५ वर्षे वयाच्या पाच जणांना मृत्यू झालाय, तर एक व्यक्ती ३५ वर्षांची तर महिला ३० वर्षांची आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत, पोलीस अधीक्षक अभिषेक आनंद यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Madhya Pradesh Seep river
Pune Accident Updates : अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण; म्हणाले, स्लॅब कोसळला तेव्हा...

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना ४-४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे.

मोहन यादव म्हणाले की, श्योमपुरच्या सीप नदीमध्ये बोट पलटून अपघात झाला आहे. यात झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. घटनेनंतर तात्काळ जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले होते. एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु झाले बोते. पण, या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दु:खामध्ये माझ्या सहवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत.

Madhya Pradesh Seep river
Pune Porsche Accident : अगरवाल कुटुंबीयांचे MPG Club रिसॉर्ट सील; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महाबळेश्वरात मोठी कारवाई

कसा झाला अपघात?

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,जोराच्या वादळामुळे बोट पलटली आहे. अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं की, बोटमध्ये एकूण ११ लोक होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी आले होते. चार जणांना वाचवण्यात आले आहे. ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह हे देखील घटनास्थळी पोहोचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com