
मध्य प्रदेशातील शिवपुरी मातातिला धरणात बोट उलटून सात जण बेपत्ता झाले. जिल्हा प्रशासन तयारीसह घटनास्थळी रवाना झाले आहे. हे लोक मंदिरात होळी खेळणार होते. या अपघातात तीन महिलांसह सात जण बेपत्ता झाले आहेत. तर ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.