कुशीनगर (उत्तर प्रदेश) - पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईने प्रेरित होऊन कुशीनगर येथील १७ नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबीयांनी ‘सिंदूर’ हे नाव दिले.
१० आणि ११ मे रोजी या दोन दिवसांत कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये जन्मलेल्या १७ नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबीयांनी ‘सिंदूर’ हे नाव दिले आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शाही यांनी दिली.