
सहमतीचे लैंगिक संबंध कलम 376 अंतर्गत बलात्कार ठरू शकत नाही : हायकोर्ट
नवी दिल्ली : दोन प्रोढ व्यक्तींमध्ये जर सहमतीनं लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असतील जे फसवणुकीच्या उद्देशानं किंवा खोटी माहिती देऊन झाले असतील तर तो कलम ३७६ अंतर्गत बलात्कार ठरु शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल केरळ हायकोर्टानं दिला आहे. न्या. बी. के. थॉमस यांनी हे नरिक्षण नोंदवताना अॅड. नवनीत नाथ यांना जामीन मंजूर केला. (Sexual relationship between two willing adults cannot be rape under Section 376 Kerala HC)
अॅड. नवनीत नाथ यांनी एका महिला वकिलाला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी शाररीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर आपल्या वचनाचा भंग करीत दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावर फिर्यादी पक्षानं आरोप केला की, ज्यावेळी पीडितेला या संभाव्य लग्नाबद्दल कळलं तेव्हा तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर अॅड. नाथ यांना कलम ३७६ (२)(n), कलम ३१३ अंतर्गत २३ जून रोजी अटक केली होती.
यावर कोर्टानं म्हटलं की, जरी दोन इच्छुक जोडीदारांमधील लैंगिक संबंध विवाहात परावर्तीत होत नसले तरीही, लैंगिक संबंधाच्या संमतीसाठी कोणतेही घटक कारणीभूत नसतील ते बलात्काराचे प्रमाण ठरणार नाही. पण नंतर लग्नास नकार देणे किंवा नातेसंबंधाचं रुपांतर लग्नात होण्यास अपयश येणं हे घटक बलात्कारास पुरेसं ठरत नाही. कोर्टानं पुढे असंही म्हटलं की, स्त्री आणि पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध केवळ तिच्या इच्छेविरुद्ध किंवा तिच्या संमतीशिवाय किंवा सक्तीने किंवा फसवणूक करून संमती मिळाल्यावरच बलात्कार ठरू शकतात.
“लग्नाच्या वचनाचे पालन न केल्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध बलात्कार तेव्हा ठरेल, जेव्हा वचन देणाऱ्याला आपला शब्द पाळायचा नसेल आणि वचन देऊन त्यानं स्त्रीला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले असेल. अशा प्रकारे शारीरिक मिलन आणि लग्नाचे वचन यांच्यात थेट संबंध असल्यासच तो बलात्कार ठरतो,’’ असंही कोर्टानं यावेळी टिपण्णी करताना म्हटलं.
Web Title: Sexual Relationship Between Two Willing Adults Cannot Be Rape Under Section 376 Kerala Hc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..