

Shahdol Drowning Incident: What Happened
esakal
मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेजवळ असलेल्या 'चौपाटी' परिसरामागील तलावात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण सुदैवाने बचावला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांचे वाहन पाहून तरुणांनी तलावात उडी मारल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या घटनेत पोलिसांची काही भूमिका होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा