शाहीनबाग आंदोलनावरती सुप्रिम कोर्ट म्हणाले...

सकाळ वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

शाहीनबाग येथे मोदी सरकारने आणलेल्या नागरिक दुरूस्ती कायद्याविरोधात (CAA) आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन गोल्या 58 दिवसांपासून सुरु आहे.

दिल्ली : शाहीन बाग आंदोलनावरती आता सुप्रिम कोर्टने टिप्पणी केली आहे. सुप्रिम कोर्टने याबाबत दिल्ली सरकार व दिल्ली पोलिसांना नोटीस पाठविली आहे.  17 फेब्रुवारीला या संदरर्भात सुनावणी केली जाणार आहे.

 PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

सुप्रिम कोर्टने म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी जास्तीत-जास्त दिवस कोणीही आंदोलन करू शकत नाही. यामुळे सार्वजनिक जीवनावरती प्रभाव पडतो तसेच ते विस्कळीत होते. यामुळे खुप दिवस सार्वजनिक ठिकाणी कोणीही आंदोलन करू नये. 

शाहीन बाग येथे मोदी सरकारने आणलेल्या नागरिक दुरूस्ती कायद्याविरोधात (CAA) आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन गोल्या 58 दिवसांपासून सुरु आहे. सुप्रिम कोर्टने म्हटले आहे की, सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत होईल असे आंदोलन कोणाही करू नये. अशा आंदोलनाचा मोठा प्रभाव सार्वजनिक जीवनावरती पडतो.

 PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

याबाबत न्यायाधीश एस के कौल आणि न्यायाधीश के एम जोसेफ यांच्या पीठाने यावर टीप्पणी केली आहे. कौल म्हणाले तुम्ही तुमच्या आंदोलनामुळे रस्ता किंवा सार्वजनिक ठीकाणी जाम करू शकत नाही. याबाबत कोर्टाने दिल्ली सरकार आणि 
दिल्ली पोलिसांना नोटीस पाठविली आहे. तसेच एका आठवड्यात याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे, के. एम. जोसेफ म्हणाले की, आम्ही ही गोष्ट समजतो की तेथे समस्या आहे. परंतू यावर आपण काय उपाय करू शकतो यावर विचार करायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shaheen bagh protest sc issues notice to delhi government delhi police