esakal | शाहीन चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जाणार, भारताला धोका नाही
sakal

बोलून बातमी शोधा

cyclone

शाहीन चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जाणार, भारताला धोका नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : एकाच आठवड्यात दोनदा चक्रीवादळ तयार झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरत असतानाच आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ (shaheen cyclone) निर्माण होणार आहे. शाहीन हे नाव ओमन देशानं दिलेलं आहे. गुरुवारी सकाळपर्यंत उत्तर अरबी समुद्रात हे चक्रीवादळ तयार होणार असून त्याचा भारताच्या किनारपट्टीवर थेट परिणाम होणार नाही, असे हवामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: ना चक्रीवादळ हलवू शकत... ना भूकंप... तमिळनाडूतील दगडाचं रहस्य !

बंगालच्या उपसागरामध्ये रविवारी गुलाब चक्रीवादळ तयार झालं होतं. त्याचा परिणाम सर्वदूर पाहायला मिळाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. हे वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या पट्टयामध्ये झालं. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. तसेच गुलाब चक्रीवादळ ओसरत असतानाच बुधवारपासूनच दक्षिण गुजरातवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत हे क्षेत्र अधिक तीव्र होईल. त्यानंतर ते पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकणार आहे, असे हवामान विभागाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ तयार होईल. हे वादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकणार नसलं तरीही गुरुवारी सकाळपर्यंत उत्तर कोकण, गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्रला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या २४ तासांत या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शाहीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर जाऊन पाकिस्तान - मकरान किनारपट्टीच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याने भारताला थेट कोणताही धोका नाही. मात्र, भारत आणि शेजारच्या हिंदी महासागरातील मच्छिमारांना 2 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

loading image
go to top