Shaktisinh Gohil : पोटनिवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत शक्तिसिंह गोहिल यांचा राजीनामा!
Political News : गुजरातमधील विसावदर आणि काडी पोटनिवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शक्तिसिंह गोहिल यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गोहिल यांनी एक्स (Twitter) वरुन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
गुजरातच्या विसावदर आणि काडी (राखीव) विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवारांच्या पराभवांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन आज राज्यसभा सदस्य शक्तिसिंह गोहिल यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.