

सीमेवरच्या युद्धात पुरूषांच्या शौर्याचे तुम्ही भरपूर किस्से ऐकले असतील. मात्र स्त्रीयांचे किस्से फार कमी ऐकायला मिळतात. भारताची पहिली महिला जवान 'शांति तिग्गा' हिने भारतीय सेनेत पुरुषांनाही मागे टाकलं होतं. भारतीय सेनेत आधी महिलांची भर्ती फक्त अधिकारी पदीच केली जायची. मात्र शांतिने ही प्रथा मोडली. शांतिसाठी हा प्रवास सोपा नसला तरी तिने ते करून दाखवलं.
पतीच्या निधनानंतर भारतीय सेनेत झाली भर्ती
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील रहिवासी शांति तिग्गाचे आईवडिल फार गरीब होते. फार कमी वयातच शांतिचं लग्न लाऊन देण्यात आलं होतं. लग्नानंतर वैवाहिक जीवन चांगलं चाललंच होतं की तिच्या पतीचं निधन झालं. कमी वयातच विधवा झालेली शांति पतीच्या जागी रेल्वे सेवेत नोकरी करू लागली. नोकरी करत ती दोन मुलांचं पालण पोषण करत होती.
आर्मी ट्रेनिंगमध्ये पुरुषांनाही सोडलं मागे
२०११ मध्ये शांतिला ९६९ रेल्वे इंजीनियर रेजिमेंट ऑफ टेरिटोरियल आर्मीच्या परीक्षेबद्दल कळलं. तिने ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दिवस रात्र मेहनत घेत तिने ट्रेनिंगमध्ये पुरुषांनाही मागे सोडलं. १.५ किमी दौड लावत तिने पुरुषांना ५ सेकंदाने मागे सोडलं होतं. तिचं हे धाडस बघून अधिकारीही प्रभावित झाले होते.
तरबेज निशाण्यासाठी मिळाली होती Marksman मार्क्समॅनची पदवी
शांति बंदूकीचा निशाणा लावण्यातही तरबेज होती. त्यामुळे तिला मार्क्समॅनची पदवी दिल्या गेली होती. तसेच तरबेज निशाणेबाजीसाठी (Trainee in the Recruitment)चा किताब देऊन तिचा सन्मान करण्यात आला होता. तसेच तिच्या कामगिरीचं कौतुक करत भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तिचा सत्कार केला होता.
शांतिचा मृत्यू एक रहस्यच
रिपोर्टनुसार काही अज्ञात गुन्हेगारांनी शांतिचं अपहरण केलं आणि तिला रेल्वे ट्रॅकवर बांधून ठेवलं होतं. पोलीसांनी वेळीच शोध लावत त्यांना रुग्णालयात भर्ती केलं होतं. त्यांच्यासाठी सुरक्षेचा बंदोबस्तही करण्यात आला होता. मात्र दरम्यान १३ मे २०१३ मध्ये रेल्वे रूग्णालयात त्यांना लटकलेलं बघितल्या गेलं. ही हत्या असली तरी हे प्रकरण आत्महत्या म्हणून दाबण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.