Sharad Pawar : शरद पवारांनी नाकारले ‘झेड प्लस’ सुरक्षा कवच

केंद्र सरकारने देऊ केलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘आहे त्या स्वरूपात’ नाकारली आहे. ‘आपल्याला वेगळ्या सुरक्षेची आवश्यकता नाही.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देऊ केलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘आहे त्या स्वरूपात’ नाकारली आहे. ‘आपल्याला वेगळ्या सुरक्षेची आवश्यकता नाही. मात्र, सुरक्षा दिली जाणार असेल तर ही व्यवस्था निवासस्थानाच्या आत असता कामा नये, खासगी वाहन बदलले जाणार नाही आणि आपल्या वाहनामध्येही दोन सुरक्षा रक्षक असणार नाहीत,’ असे स्पष्टपणे पवार यांनी गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com