Sharad Pawar | घडामोडींना वेग! राऊत फडणवीसांनंतर शरद पवार दिल्लीकडे रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umesh Shelke writes about why Narendra Modi targets Sharad Pawar

घडामोडींना वेग! राऊत फडणवीसांनंतर शरद पवार दिल्लीकडे रवाना

sakal_logo
By
ओमकार वाबळे

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे. मागील चार दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी काल अमित शाहांची भेटही घेतली. आज देवेंद्र फडणवीस राजधानीत दाखल झाले. ते जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं समोर येतंय. सध्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची बंद दाराआड तीन तासांपासून चर्चा सुरू आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन असल्याने संजय राऊत दिल्लीत रवाना झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षांच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांनी नरेंद्र मोदींच्या संविधान कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली. यादरम्यान, आता शरद पवारांनीही दिल्लीसाठी कूच केलंय. मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी राजधानी गाठली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सतत अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांचा सुरू आहे. केंद्रातील सरकारचा त्याला पाठिंबा आहे. काहीही झालं तरी हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास नेते व्यक्त करतात. मात्र, अचानक वाढलेल्या घडामोडींनी राजकीय पटलावर अस्थिरता वाढली आहे. विरोधकांची बैठक असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

राज्यात विधानपरिषद निवडणुकांसाठी जागा उमेदवाऱ्या जाहीर झाल्या आहेत. त्यातच तीन-चार महिन्यांवर 6 मनपाच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर असताना ही राजकीय खलबतं सुरू झाल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.

loading image
go to top