esakal | पंतप्रधान मोदींबरोबर राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर चर्चा - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi-sharad pawar

पंतप्रधान मोदींबरोबर राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर चर्चा - शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा (discussion) झाली. २०१९ नंतर प्रथमच पवारांनी मोदींची भेट घेतली. (Sharad Pawar meets PM Modi says no politics was discussed-dmp82)

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या तीन पक्षात मतभेदाच्या बातम्या येत असताना, शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट होणे, ही महत्त्वाची बाब आहे. राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर पवारांनी राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगितले. सहकारी बँका आणि सहकारी चळवळ टिकली पाहिजे असे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

हेही वाचा: राज ठाकरे नाशिकमध्ये, अमित ठाकरेंकडे येऊ शकते मोठी जबाबदारी

अलीकडेच केंद्राने सहकार खात्याची स्थापना केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या खात्याचे मंत्री आहेत. पंतप्रधानांसोबत देशातील कोविड स्थितीसंदर्भात चर्चा झाल्याचेही पवारांनी सांगितले. रविवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्यात पवारही सहभागी होणार आहेत.

loading image