esakal | राज ठाकरे नाशिकमध्ये, अमित ठाकरेंकडे येऊ शकते मोठी जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray

राज ठाकरे नाशिकमध्ये, अमित ठाकरेंकडे येऊ शकते मोठी जबाबदारी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Mns raj thackeray) तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर (nashik tour) आहेत. आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काही महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (corporation election) तयारीच्या दृष्टीने राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. पक्षाच्या स्थापनेपासून (party foundation) नाशिकमध्ये मनसेला घवघवीत यश मिळालं होतं. (Raj thackeray in nashik amit thackeray could be next mns student wing president dmp82)

काल दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज ठाकरे नाशिकमध्ये असताना, मनसेला एक मोठा झटका बसला. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व सरचिटणीस आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar joins Shivsena) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य यांचे वडिल राजन शिरोडकर आणि राज ठाकरे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी हा एक धक्का मानला जातोय.

हेही वाचा: 'चला !!! मनसे विद्यार्थी सेनेचं ग्रहण सुटलं', अभिजीत पानसेंचा मार्मिक टोला

पण आदित्य शिरोडकरच्या मनसे प्रवेशामुळे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद रिक्त झालय. तिथे राज यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांची निवड होऊ शकते. सध्या राजकीय वर्तुळात अशीच चर्चा सुरु आहे. स्वत: राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेतून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं.

हेही वाचा: मेट्रोसाठी मालाडमध्ये झोपडपट्ट्यांवर कारवाई, अतुल भातखळकरांना घेतलं ताब्यात

अमित ठाकरे यांच्याकडे मनसेचं नेतेपद आहे. त्यामाध्यमातून ते राजकारणात सक्रिय आहेत. सध्या कोविड काळात त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. विद्यार्थी, डॉक्टरांचे प्रश्न घेऊन त्यांनी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. भविष्यात विद्यार्थी नेता म्हणून एक वेगळी ओळख बनवण्याची संधी अमित ठाकरेंकडे आहे. मनसेचा पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणजे शिवसेना. सध्या या दोन्ही पक्षांकडे तरुणाईचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. अमित ठाकरेंकडे विद्यार्थी सेनेचे नेतृत्व आल्यास तरुणाईला आकर्षित करण्याची शिवसेना आणि मनसेमध्ये चढा-ओढ आणखी तीव्र होईल.

loading image