PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत शरद पवार यांनी मांडलं मत; म्हणाले, 'पंतप्रधान ही एक...'

Narendra Modi Sharad Pawar
Narendra Modi Sharad Pawar

नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या राज्यातील निवडणुकांसंदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पाच राज्यातील निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी तीन राज्यांमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये उतरणार असल्याचं शरद पवार यांनी घोषित केलं आहे. सोबतच शरद पवार यांनी पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे घडलेल्या घटनेवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही भाष्य केलंय.

Narendra Modi Sharad Pawar
शरद पवारांनी घेतला योगी आदित्यनाथ यांचा समाचार; म्हणाले, 'मुख्यमंत्री हा...'

शरद पवार यांनी म्हटलंय की, सुरक्षेबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने त्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यातून वास्तव समोर येईल. पंतप्रधान ही एक संस्था आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र असो किंवा राज्य सर्वांवर असते. त्याची खबरदारी घेतलीच पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वोच्च न्यायालयाने एकदा त्याच्या चौकशीसाठी व्यवस्था नेमली असेल तर त्यावर कोणतंही वक्तव्य करणं योग्य नाही. मलाही त्यावर वक्तव्य करणं योग्य वाटत नाही. यातून सत्य लोकांसमोर येईल हे नक्की, असं त्यांनी म्हटलंय.

Narendra Modi Sharad Pawar
पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार

पाचपैकी तीन राज्यांत राष्ट्रवादी लढवणार निवडणूक

मणिपूर विधानसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून लढतील. पाच जागांवर आम्ही लढू असं शरद पवार यांनी सांगितलंय.

दुसरीकडे, गोव्यात काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे. त्या ठिकाणी येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. गोव्यात परिवर्तनाची गरज आहे. भाजप पक्ष हटवण्याचा प्रयत्न करणार. गोव्यात शिवसेनेला एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरु आहे.

यूपीमधअये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झआलीये. लखनऊमध्ये जागांच्या वाटपांसाठी बैठक होणार आहे, असं त्यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com